Ad will apear here
Next
भगवद्गीता- पाल्यांसाठी व पालकांसाठी
सध्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियामुळे समाजावर अशा बातम्यांचे परिणामही विपरीत होत असतात. अशा वातावरणामुळे पालकांना आपल्या पाल्यांची चिंता वाटत असते. माणसाला कुकर्मापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षेची भीती दाखविणे हा एक मार्ग आहे; मात्र यात कायद्याचा आधार घ्यावा लागत असल्याने ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असते. मग दुसरा पर्याय कोणता, तर समाजातील माणसांना एकमेकांबद्दल प्रेम, आस्था वाटणे, हे शक्य होण्यासाठी भगवद्गीता हे प्रभावी मध्यम असल्याचे सांगून निवृत्त आयएएस अधिकारी शरदचंद्र बोर्डे यांनी ‘भगवद्गीता- पाल्यांसाठी व पालकांसाठी’मधून गीतेतील अध्यायांमधून सदवर्तन, सदाचार, प्रामाणिकपणा जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

यात गीतेचा श्लोक, त्याची फोड म्हणजेच श्लोकांचे संस्कृतमध्ये गद्य रूपांतर व प्रत्येक संस्कृत शब्दाखाली मराठी शब्द अशी मांडणी तीन रंगांत केली आहे. यामुळे गद्य रूपामुळे गीतेतील संस्कृत भाषेतील श्लोकही समजतात व उच्चारण्यास सोपे जाते. शिवाय पाठांतरासाठी कोणते श्लोक उपयुक्त आहे, हेही नमूद केले आहे.       

प्रकाशन : रश्मी पब्लिकेशन जळगाव
पृष्ठे : २८०
मूल्य : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZRKBU
Similar Posts
संपूर्ण पंचतंत्र प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वाधिक लोकप्रिय संग्रह मानला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभागल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्रविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा
बालसाहित्य मोफत उपलब्ध नाशिक : येथील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे लहान मुलांना घरी वाचनासाठी ‘बालसाहित्य’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. टिळकवाडी येथील के. ज. म्हात्रे वाचनालय आणि गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारक वाचनालय, येथे इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बालसाहित्य उपलब्ध आहेत. तसेच ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’मधील
पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा! पुणे : मुले आणि वाचनात दंग... काहीतरीच काय? आजकालची मुलं वाचतात कुठे? सारखी मोबाइल आणि टीव्हीवर काहीतरी पाहण्यात दंग झालेली असतात, अशी तक्रार अनेक पालक करत असतात. पुण्यातील हर्षदा पेंढारकर आणि काही समविचारी पालकांनी यावरच एक चांगला उपाय शोधून काढला आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसू लागला आहे. मोठ्यांच्या
ट्रेझर आयलँड कुमारवयीन मुलांसाठी मराठीमधून लेखन करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बहुतांश मुले इंग्रजीतील साहित्याकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर विलास फडके यांनी लिहिलेले हे पुस्तक वेगळे ठरावे. नकाशाच्या साह्याने दुर्गम आयलँडवर स्वारी करायला निघालेला नायक जीम हॉकिन्स, धाडसी कॅप्टन अन् त्याच्या सहकाऱ्यांची ही कथा आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language